Thursday, 16 February 2017

रंग

आपल्या कडे सुंदर म्हणजे साधारण गोरी व्यक्ती असे काहीसे समीकरण आहे. अगदी दोन सारख्या दिसणाऱ्या व्यक्ती असल्या तरी जी व्यक्ती जरा रंगाने उजळ असते तीच छान असे काहीसे समीकरण आहे. लग्न करताना हि प्रत्येक जण मुलगा किंवा मुलगी दिसायला कसे आहेत ते पाहतात. नाकाचे भजे असले , डोळे बारीक असो किंवा आणखी काही पण रंग गोरा असला कि सगळे चालून जाते. बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम असतात. पण हा विचार कुणी करत नाही कि अचानक काही झाले आणि कुरुपत्व आले मग काय संसार अर्ध्यावर सोडून जाणार का ? 
"अगं तू गोरी आहेस, कुठलाही रंग शोभेल तुला" असे संवाद बऱ्याच वेळा ऐकायला येतात आपल्याला. सावळ्या  रंगावर काही शोभत नाही का? हा दुजाभाव का? आपणच स्वतःला का कमी लेखतो. मुळात रंग हा काही गुण नाही ज्याची तुलना व्हावी. मुळात कोणाची कोणाही तुलना करणेच चूक आहे कारण प्रत्येक जण वेगळा असतो , त्याचे गुण वेगळे असतात. तुलना करून  आपण लोकांना दुखावते आणि मग नको त्या जाहिराती वाल्यांचे फावते. 

मुळात रंगाने सावळे असणे म्हणजे वाईट दिसणे हे समीकरणच कळत नाही. भगवान श्रीकृष्ण हि सावळे आणि आपली विठू माउली हि सावलीच ना . पण आपण मनोभावे पूजा करतो ना त्यांची. मग माणसांमध्ये हा भेद का? आपण त्या बाहेरच्या देशांनाही म्हणतो गोऱ्यांचे  देश पण आपल्या देश सारखी रंगाचीच काय तर इतर कशाचीही विविधता आहे का त्यांच्या कडे?

आपल्या गोऱ्या रंगावर गर्व करणारी हि बरीच माणसे असतात , पण देवाने दिलेली गोष्ट आहे ती, जी कमावण्यात आपला काहीच वाटा नाही त्या गोष्टीचा गर्व का करावा? 

सुंदर दिसण्याचा प्रयत्न करण्या पेक्षा मानाने सुंदर होण्याचा प्रयत्न करावा, अगदी जग नाही जिंकता आले तरी या जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या माणसांची मने मात्र नक्कीच जिंकता येतील. 




11 comments:

  1. Uttam �� agreed with Ur words... Actually my opinion is also same about this...

    Varnabhed Nako fakt aikayache ...Matra swatavar karayachi vel aali ki �� aikave janache n karave manache ase hote...

    Vinda

    ReplyDelete
  2. खरे आहे एकदम ... खरेतर भेदभावाला इथूनच सुरुवात होते ... " रंग "....मग जात धर्म उच्च नीच ...जन्मलेल्या गोर्या बाळाचे पण आपण रंगावरून आधी कौतुक करतो ... सावळ्या बाळाला ते कौतुक नाही

    ReplyDelete
  3. सुंदर लिहिले आहे मिलन
    चला म्हणजे ना गोरे ना काळे ते सुटले यातून

    ReplyDelete
  4. सुंदर लिहिले आहे मिलन
    चला म्हणजे ना गोरे ना काळे ते सुटले यातून

    ReplyDelete
  5. Jabri..

    Beautifully described combo of eyes and noes.😂

    U get that what I wann to say Taaygya.

    ReplyDelete
  6. radha kyon gori,,, savala ga ram maza,

    savage IDOLS savle...pan gore panache bhut utrat nahi.....1000 varshanchi gulamgiri hi varnane GORYA lokanchi ( the ARAB sot ki YAVAN ki BRITISH)....tyamule GORE pant ha SHRESHTA pan thereat aahe

    ReplyDelete
  7. Khup chhan vastistithi sangitalis....( Te suddha agadi gorya vyaktine!!☺, In lighter sense.. )... Khup changale vishleshan....
    Bu

    ReplyDelete
  8. right ekdam barober gorya mansana jara jastch garv asto swatachya rangacha ani te kalya mansana kami lektat. khup chan tai mast

    ReplyDelete