"थँक यू " आहेत दोनच शब्द पण म्हणायला खूप कठीण. एखाद्या परक्या माणसाला आपण सहज म्हणून टाकतो पण तेच आपल्या माणसांना म्हणायला ते खूप जड. कुणा एका अनोळखीव्यक्तीने आपल्याला थोडी हि मदत केली तर आपण लगेच थँक्स म्हणून मोकळे होतो , अगदी सहजच ते आपल्या तोंडून जाते. पण कधी विचार केलाय आपण आपल्या आसपासच्या लोकांचे कधी मानतो का आभार? आपले आई वडील आपल्या साठी इतके काही करतात पण आपण त्यांना कधी थँक्स म्हणत नाही. जे करतात ते त्यांचे कर्तव्य आहे असाच समज असतो आपला. आपल्या मुलांनाही कधी थँक्स म्हणावे असे आपल्याला वाटत नाही. आता मुलांना का म्हणायचे थँक्स हा प्रश्न आहेच. पण आपल्याला पालकत्व देणाऱ्या त्या चिमुरड्या जीवाला का देऊ नये धन्यवाद ? जगातली सर्वात सुंदर जाणीव आपल्याला करून देणाऱ्या मुलांना कधीतरी थँक्स म्हणायला काय हरकत आहे. त्यांच्या मुळे किती तरी वेळा आपल्या आयुष्यात अभिमानाचे क्षण येतात. घरातली कुठलीही व्यक्ती जी आपले काम एक कर्तव्य म्हणून करते त्या प्रत्येकालाच आपण "थँक्स" म्हटले पाहिजे, मग ते आई, बाबा असोत , नवरा बायको असोत किंवा आपली मुले.
आपल्याला मदत करणारे आपले शेजारी , इमाने इतबारे आपल्याकडे बरेच वर्ष काम करणारी आपली कामवाली किंवा नोकर माणसे. त्यांना पगार देतो म्हणून ते काम करतात ठीक आहे पण तरीही माणुसकी म्हणून कधीतरी त्यांचे हि आभार मानायला काय हरकत आहे.तिथे परदेशात म्हणे "थँक्स गिविंग डे " साजरा करतात म्हणे. आपण तर रोजच साजरा करू शकतो ना. आपल्या आयुष्यात अशी बरीच माणसे असतात जी अप्रत्यक्षपणे आपल्याला मदत करत असतात, बरीच माणसे अशी असतात कि ज्यांना तुमच्या कडून थँक्स ची अपेक्षा नसते किंवा तुम्ही हि त्यांच्या साठी काही करावे अशीही अपेक्षा नसते तरी ती तुमच्या साठी काही ना काही करत असतात. आपणही त्यांना कधीच थँक्स म्हणत नाही , मुद्दाम असे नाही पण त्यांचे प्रयत्न आपल्या ध्यानातच येत नाहीत. अशा सगळ्यांनाच एकदा थँक्स म्हणायलाच हवे. जितक्या सहजतेने आपण आपल्या मित्र किंवा मैत्रिणीच्या खांद्यावर थाप मारून म्हणतो "थँक्स यार " , तसेच आपल्या साठी मनापासून काहीतरी प्रत्येकाच्या खांद्यावर अशी प्रेमाची थाप नक्कीच द्या . तुमच्या एका आभार मानण्याने त्यांच्या मनातले तुमच्या बद्दल चे प्रेम आपुलकी दुपटीने वाढेल.
माझ्या हि आयुष्यात आलेल्या माझ्या प्रत्येक शुभ चिंतकाला, मला अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष पणे मदत करणाऱ्या प्रत्येकालाच माझ्या कडून शतशः धन्यवाद.
Very true Milan. Apan aply javalchy vyaktina kadhich thx mhanat nahi
ReplyDeleteYes we need to correct this practice and thanks for beautiful block
keep posting
खुप्प छान लिहिले आहेस .... विचार करण्यासारखे आहे खरच ... आम्हाला एवढे छान छान लेख वाचयला मिळाल्याबद्दल " Thanks "
ReplyDeleteVery true. ... Really we should be more expressive .... With near and dear ones... Thanks for blog...
ReplyDeleteKhup chan and expressive.
ReplyDeleteHmmm..true
ReplyDeleteThanks Milan :)
ReplyDeleteThank you all .
ReplyDelete