फेब्रुवारी महिना म्हटलं कि वेध लागतात ते वॅलेंटाईन्स डे चे. अगदी शाळेच्या मुलांपासून ते अगदी लग्न झालेल्या जोडप्यांपर्यंत सगळ्यांनाच. नुकत्याच प्रेमात पडलेल्या लोकांना तर हा दिवस म्हणजे दिवाळीच. खरतर हा दिवस म्हणजे त्या "वॅलेंटाईन्स" नावाच्या संतांचा पुण्यस्मरण दिवस म्हणायला हवा. ज्या मुलाला एखादी मुलगी किंवा एखाद्या मुलीला एखादा मुलगा आवडत असेल तर याच दिवशी प्रेम व्यक्त करायाचे कारण या दिवशी नकार यायची शक्यता फार कमी असते असा समज आहे . नकार पचवायची ताकद नसेल तर प्रेम करायचेच का? असे जबरदस्ती चे प्रेम काय उपयोगाचे. जर तुमचे खरंच प्रेम आहे तर वर्षांचे ३६५ दिवस आहेत कि, कशाला निवडून एकच दिवस हवा प्रेम व्यक्त करायला. आणि प्रेम साजर करायला हि तो एकच दिवस कशाला हवा? तुमची झालेली पहिले भेट, त्याचा वाढदिवस तिचा वाढदिवस, प्रथमच एकमेकांशी बोललात तो दिवस , कितीतरी दिवस असतात साजरे करायाला पण आपण मात्र तो एकच दिवस धरून बसतो. काही काही लोकांची तर मला गम्मतच वाटते म्हणजे एरवी त्यांना अजिबात वेळ नसतो एकमेकांशी बोलायला, भेटायला पण या दिवशी आवर्जून वेळ काढतील. एकमेकांना भेटी देतील. हे कसले दिखाऊ प्रेम. आणि प्रेम फक्त एक मुलगी आणि मुलगा यातच येत का? आपण आपल्या आई वडील , भावंडांवर हि प्रेम करतो , मित्र मैत्रिणींवर हि करतो मग त्यांच्या सोबत का नाही करत हा दिवस साजरा? आणि जर तुमचे प्रेम खरें असेल ना तर त्याला अशा विशिष्ट दिवसाची गरज नाही ते कधीही व्यक्त करा ते तुमचेच असेल. त्या दिवशी होकार घेऊन २ महिन्यांनी वेगळे होणारे प्रेम करायचेच कशाला? आधी कुठे होता वॅलेंटाईन्स डे तरी लोकं प्रेमात पडतच होती ना आणि निभावत पण होती. एका अपंग व्यक्ती वर एका धडधाकट माणसाने २५ वर्ष प्रेम केले आणि लग्न हि केले तिच्याशीच त्यांनी नाही केला कधी वॅलेंटाईन्स डे साजरा. आज वयाच्या साठी मध्ये हि ते एकमेकांची सोबत देत आहेत याला म्हणतात प्रेम. करायचे असेल तर निर्मळ, निस्वार्थी प्रेम करा. असे पाश्चात्य संस्कृती चे अनुकरण कशाला? त्यापेक्षा आपल्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तीच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्यांना सरप्राइज द्या , त्यावेळी त्यांच्या चेहऱ्या वरचा आनंद हा तुमच्या ठरवून दिलेल्या वॅलेंटाईन गिफ्ट पेक्षा कितीतरी पटीने जास्त आनंद देईल त्यांना हि आणि तुम्हालाही.
तरीही नुकत्याच प्रेमात पडलेल्या आणि वॅलेंटाईन्स डे च्या दिवशी प्रेमाच्या महासागरात हेलकावे खाणाऱ्या सगळ्याच प्रेमवीरांना आमच्याकाढून खूप खूप शुभेच्छा.
मस्त मिलन ... हा तुझा लेख ... पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करण्यार्यांच्या कानाखाली एक सणसणीत चपराक आहे...लगे रहो
ReplyDeleteप्रत्येकाची मते वेगळी. मी माझे मत मांडले.
ReplyDeleteKhup chan lihil ahes.prem prem aste te vyakt karayla kharch fakt 1 day ka. Te tar manat yete ani jyachya badal vatate tya vaykti samor kadhi hi vaykt kel tar te prem.
ReplyDeleteMast
ReplyDeleteKup chhan lihites Milan
ReplyDeleteKeep good work going lekhika
Khup chhan. Chhan vivechan...... He 'day" sanskruti che apan andhanukara n karat ahot ...
ReplyDeleteKeep it up.....
Mast .. khup chan..
ReplyDeleteमिलन , chaan lekh.mazya mate aaplyakade ek fashio aahe Bharatiya Sanskruti la ( especially Muhurta wagaie HINDU paddhatinna ) nawe thewnyachi.Mag he V Day , F day , M day kay aahe ?
ReplyDeleteAnyways..... mala V day aawadto karab MAZI MADGUBALA 14 FEB LA JANMALA AALI.....
perfect lihile ahe tai prem karat ahat tar te fhakt ekach divshi evdhe utu ka ghalvtat 365 divas utu gele pahije na........
ReplyDelete