" सॉरी" एका शब्दात सगळे गुन्हे माफ. काही करा आणि सॉरी म्हणा कि समोरच्या व्यक्तीने माफ केलेच पाहिजे असे काहीसे गृहीत धरूनच आपण सॉरी म्हणतो. एखाद्या व्यक्तीला खूप दुखावून मग माफी मागण्यात काय अर्थ आहे , नुसत्या सॉरी ने समोरच्याचे दुःख हलके होणार असते का ? आश्चर्य अशा व्यक्तींचे वाटते जे ३-४ वर्ष किंवा जास्त एकमेकांसोबत असतात आणि अचानक एक दिवस त्यातले कुणीतरी एक म्हणते " सॉरी आपले काही जमणार नाही , आज पासून सगळे संपले." इतक्या काळाचे ऋणानुबंध असे एका शब्दाने संपवता येतात?? हल्लीच्या पिढीचे हि थोडे फार असेच आहे मित्र मैत्रिणींना शंभर वेळा सॉरी म्हणतील पण आपण एखाद्या चुकी वरून रागावलो , ओरडलो तरी एका शब्दाने सॉरी येणार नाही. घरच्यांना किंवा पालकांना सॉरी म्हणायला थोडा कमीपणा प्रत्येकालाच वाटत असतो. काही जण असेही हि असतात कि सतत सारख्या त्याच त्याच चुका करतात आणि दर वेळी सॉरी म्हणतात , अशा वेळी आपल्याला " अंग्रेज चले गए , सॉरी छोड गए" हे वाक्य आठवते.
जशा नाण्याच्या दोन बाजू तश्या या सॉरी च्या हि दोन बाजू आहेत . एखादी व्यक्ती अगदी मनापासून तुमची माफी मागते, नकळत का होईना आपण एखाद्याला दुखावले आहे याची जाणीव असते त्यांना. पण तरीही कधी कधी परिस्तिथी इतकी हाताबाहेर गेलेली असते कि नुसते सॉरी म्हणून परिथिती बदलत नाही. समोरची व्यक्ती तुम्हाला माफ करण्याच्या पलीकडे गेलेली असते. आपल्या सगळ्यांनाच स्वतःची चूक पटकन लक्षात येत नाही. पण समोरच्याने जराही दुखावले तरी आपण सॉरी ची अपेक्षा करतो. " सॉरी" या एका शब्दात खरंतर तुटणारी नाती टिकवण्याची ताकद आहे. त्यामुळे परिस्थिती वाईट होण्या आधीच , एकमेकांच्या चुका शोधण्यापेक्षा एक पाऊल पुढे होऊन आपणच " सॉरी" म्हणून तुटणारी नाही जोपासण्याचा प्रयत्न करूया. फक्त लहानांनीच माफी मागावी हि प्रथा मोडून आपणही आपल्या मनाचा मोठेपण दाखवूया.
दुसऱ्याला दुखावून माफी मागण्यापेक्षा , त्याची कमीत कमी वेळ यावी असेच वागण्याचा आपण प्रयत्न करू या.
दुसऱ्याला दुखावून माफी मागण्यापेक्षा , त्याची कमीत कमी वेळ यावी असेच वागण्याचा आपण प्रयत्न करू या.
खरे आहे .... आपण आपली चूक ओळखून सॉरी म्हणणे पण गरजेचे असते...पण रागात आपण समोरच्याने सॉरी बोलायचीच अपेक्षा करतो ...खरच खूप लहान word आहे सॉरी पण त्याची ताकद खूप आहे नाती टिकवण्याची ,...फक्र तो कधी वापरायचा याचे भान असायला हवे प्रत्येका कडे .... मस्त मिलन छान लिहिलेयस
ReplyDeleteTrue
ReplyDeleteAgain one more realistic article Milan. Keep it up.
ReplyDeleteSorry iz d word for others.
ReplyDeleteI have never heard that word from my sister even on her mistakes.����
tech lihile ahe na. aplya mansana bolayala jad jate.
Delete😂😂
DeleteSORRRRY ha Minal late wachla ����khup chan
ReplyDeleteKhup chan ..
ReplyDeleteSHRIKANT
Mast kaki loved it😍😍
ReplyDeleteThank u all👧👍
ReplyDeletereally kahina khup jad jate sorry bolayla mastch lihile ahe tai tumhi
ReplyDeleteThank you very much for all comments 🙏🏻
Deletewelcome mastch lihita tumhi asech amhala ankhi chan chan vachyala milu de tai
ReplyDeleteMala tumche nav kalel ka? Mi olakh ale nahi
Deletemaze nav rajashri pisal mi tumche mitra bhushan kadam tyanche office madye ahe tumche blog mala vachyala dile ahet khup chan lihita tumhi kharch mi jan-2017 pasun ghetle ahe jevdhe vachle ahet ata paryant tevhde khup sundar ahet apratim ahet tai...
ReplyDelete