(गवसली नात्यातील मैत्री)
मैत्री म्हटले की आपल्या डोळ्यासमोर मित्रमैत्रिणीच येतात. शाळेतले, कॉलेज मधले, ट्रेन मधले आजूबाजूचे सगळेच. पण आपली भावंडे ही आपले पाहिले मित्रमैत्रिण असतात. माझ्यासाठी माझी भावंडे, भाचे भाच्या हे अगदी मित्रा मैत्रिणींसारखेच आहेत. त्यांच्यापेक्षा दुप्पट वयाची असूनही त्यांना प्रत्येक पिकनिक ला मी हवीच असते. रक्षाबंधन , भाऊबीज अशा सणांना तर आम्ही भेटतोच पण वर्षातून एकदा आम्ही कुठेतरी पिकनिक ला ही जातो. ज्यावेळी आम्ही एकत्र असतो त्यावेळी अगदी मित्रमैत्रिणी मध्ये चालते तशी थट्टामस्करी चालते. लहान मोठे, आत्यभाचा, भाऊ बहीण ही नाती विसरून फक्त धमाल असते. कुणाचे वाढदिवस असोत, कुणाकडे पूजा, किंवा कुणाचे वाढदिवस असो आम्ही सगळे मिळूनच जातो. सगळे हेवेदावे विसरून आम्ही तो तो दिवस एन्जॉय करतो.
मी
मोठी आहे म्हणून माझ्यावर सगळ्यांची जबाबदारी असते. पण मोठी आहे म्हणून
माझी मस्करी करायला कुणी मागे नसतं. अशावेळी कोण कुणाचा दादा आणि कोण
कुणाची ताई याचे भान नसते. समोरची व्यक्ती ही फक्त आपली दोस्त असल्यासारखे
वागतात. आम्ही आमचा व्हाट्सएप ग्रुप ही बनवला आहे "नात्यांची जपणूक". इथे
फक्त सगळी यंग ब्रिगेड आहे मी सोडून.
कधी कधी वाद ही
होतात, रुसवे फुगवे ही होतात, पण रुसणारि व्यक्ती १० मिनिटांच्या वर रुसून
राहू शकत नाही कारण कुणीतरी असे काही बोलून जाते की त्या व्यक्तीला बोलावेच
लागते. आणि मग त्या विषयावर अशी काही टिप्पणी होते की हसून हसून डोळ्यात
पाणी येते.
जयेश, विकी, निखिल, मिथिल, मिताली, मंथन,
ओंकार , आकांक्षा, हर्षु, विद्या, आणि आमचं शेंडेफळ मयूर अशी आमची ही गँग.
आता त्यात अजून एक दोन जण समाविष्ट झाले आहेत. आमची ही नात्याची जपणूक
कायम अशीच राहू दे.
are wa mastch ahe tumche nate ......... ashich asavit nati mast enjoy karnare sagle tyat nako rusva fugva asla tari shanik asava tar te nate tikte . mast chan ahe tumche nate enjoyyyyyyyyyy..........
ReplyDelete