Thursday, 16 November 2017

अधुरी कहाणी

संध्याकाळचे ७ वाजले होते  तो घरी आला बूट काढले आणि सोफ्यावर बॅग ठेवूली. शूज काढताण त्याच्या लक्षात आले होते कि  सना आलीय. शक्यतो ती त्याच्या नंतर घरी येते पण आज अचानक लवकर? त्याचा डोक्यावर सूक्ष्म आठी पडली. फ्रेश होऊन आल्यावर चहा घेता घेता त्याने विचारले " सना आज लवकर आली का ? आहे कुठे ? ' बायकोने जरा वैतागूनच उत्तर दिले " हो कधीच आलीय. बरे वाटत नाही म्हणून लवकर आलीय . आल्यापासून मूड खराब आहे बाहेरही आली नाही. " त्याला आता जरा चिंता वाटू लागली. हातात चहाचा कप घेऊन तो सनाच्या खोली जवळ गेला आणि बाहेरूनच म्हणाला " सना बेटा ... काय झाले? बरे वाटतेय का आता ? ये चहा घेऊ एकत्र.. " आतून आवाज आला " हो पप्पा आले" आवाज थोडा रडवेला होता. सना बाहेर अली तिचे डोळे लाल झाले होते . नाकातून पाणी वाहत होते. डोळे थोडे सुजले होते. त्याला आता खरंच चिंता वाटू लागली नक्की काहीतरी बिनसले आहे. नाहीतर अशी स्वतःला कोंडून घेणारी सना नाही. प्रत्येक गोष्ट पॉसिटीव्हली घेणाऱ्या सनाचे नक्कीच काहीतरी मोठे बिनसले आहे.
        सना त्याची एकुलती एक मुलगी. त्याच्या काळजाचा तुकडा. त्याच्या लाडाने तिला बिघडवले असे सगळ्यांचेच मत. सनाच्या सडेतोड स्वभावामुळं आईशी तिचे सूत हवे तसे  जुळत  नव्हते. जे काही सीक्रेट शेअरिंग असेल ते पप्पा कडे.  गेल्या एक महिन्यापासून सना सतत उदास राहत होती. कशातही लक्ष नसायचे. बऱ्याच वेळा चेहराही रडवेला असायचा. घरी असली तरी स्वतःच्या खोलीत बसून असायची. जरा जराश्या गोष्टींवरून चिडचिड करत होती.  आधी वाटले विशाल यु.एस ला गेला कदाचित त्याच्या आठवणीमुळे असेल. पण विशाल ला जाऊन तर आता वर्ष होत आले होते. विशाल सनाच्या ऑफिस मध्ये काम करत होता. तो सनाला सिनिअर होता. एकत्र काम करता करता कधी एक मेकांच्या प्रेमात पडले त्यांनाही कळलं नाही. ज्या दिवशी विशाल ने सनाला प्रपोज केले होते तो दिवस आठवला. त्या दिवशी गाणं गुणगुणत सना ने घरात एन्ट्री केली 'आज मै उपर आसमान नीचे' .  आल्या आल्या आईने विचारले काय आज स्वारी जाम खुश आहे तर आईला मिठी मारून एक पापा घेऊन ' होsss ' असे जोरदार उत्तर देऊन " आई कडक चहा ठेव ग " अशी आरोळी ठोकत सना फ्रेश व्हायाला  गेली .  तो घरी आल्यावर आई आणि त्याला दोघांना तिने ती गोड बातमी दिली. आई ने हजार शंका काढल्या नक्की कोण, जात काय ? सिरीयस आहेत ना? कि फक्त टाइमपास? पण तो मात्र खुश होता आपल्या मुलीला खुश पाहणे हेच त्याच्यासाठी सबकुछ होते. पण आपली मुलगी आता पूर्णपणे आपली राहिले नाही हि भावना कुठेतरी थोडेसे हलवून गेली त्याला. त्याने सांगितले " बेटा , एक दिवस घरी घेऊन ये विशाल ला ". सना आनंदात हो पप्पा म्हणून फोन घेऊन तिच्या रूम मध्ये पळाली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद काही औरच होता. 
         एक दिवस सना विशाल ला घरी घेऊन अली . त्याची ओळख करून दिली. देखणा , रुबाबदार आणि मनमिळावू.  भेटीत विशाल ची आणि त्याची गट्टी जमली. त्यानंतर विशाल चे घरी येणे जाणे होतच होते. सनाच्या आईला कधी कधी त्याचे हे अति जवळीक साधणे  आवडत नसे. आई वडील परगावी असल्यामुळे हा मित्रांबरोबर भाड्याने घर घेऊन राहत होता. त्यामुळे कधीतरी डिनर ला , कधी सणावाराला त्याचे येणे होत होते . आईचा सनाच्या मागे तगादा असे कि " अगं , त्याच्याशी बोल . त्याच्या आई बाबांना भेट , काय ते एकदा नक्की करा." पण जॉब नवीन असल्यामुळे ते दोघे तयार नव्हते. त्यात १-२ वर्ष एकमेकांना समजून घेऊन मग निर्णय घ्यायचा असे त्यांचे ठरले होते. त्याला हे पटत होते पण सनाच्या आईला नाही. त्याला हि कुठंतरी खटकत होते पण मुलीच्या प्रेमापोटी तो थोडे दुर्लक्ष करत होता. 
           मध्यंतरीच्या काळात विशाल ची परगावी बदली झाली होती. त्या दिवशी सनाचा अगदी चेहरा रडवेला होता. तिला विशाल शिवाय राहणे कठीण जाणार होते.त्या पंधरा दिवसात सना खूप बैचेन होती. विशाल चा फोन आला कि मात्र तिची कळी  खुलत होती. कधी कधी दोघे रात्र भर गप्पा मारत. सकाळी मग तिचे डोळे सुजलेले असत. दोघांना एकमेकांशिवाय करमत नव्हते. ज्या दिवशी विशाल परत आला त्याच दिवशी रात्री तो घरी जेवायला आला होता. सगळ्या तिकडच्या गोष्टी, मजा आणि कामाचे स्वरूप सगळेच शेअर करत होता. त्याच्या बोलण्यातून त्याचा आत्मविश्वास दिसत होता. त्याच्या याच कामाचे चीज म्हणून त्याला नवीन प्रोजेक्ट साठी परदेशी पाठवण्यात आले होते. सुरवातीच्या १-२ महिन्यात सगळे सुरळीत चालले होते. पण नंतर काहीतरी बिनसले होते. सनाच्या रूम मधून तिचे जोरजोरात भांडायचे आवाज यायचे. बऱ्याच वेळा सकाळी तिचे डोळे सुजलेले असायचे. त्याने खूप प्रयत्न केला विचारायचा पण सना नीट उत्तर देत नव्हती. त्याने एक दोनदा विशाल ला हि कॉन्टॅक्ट केला पण त्याने हि नीट काही सांगितले नाही. त्याचे टेन्शन वाढत होते. सनाची होणारी तगमग त्याला पाहवत नव्हती , त्यात सनाच्या आईची भुणभुण सुरूच होती. तो जास्तच वैतागला होता . आणि शेवटी आज इतक्या महिन्यांनी काहीतरी विपरीत घडलेय हे नक्की झाले. 
     सना चहा चा कप घेऊन तिच्या रूम मध्ये गेली. आई तिच्याकडे रागाने पाहत होती. याने तिला डोळ्यानेच शांत राहा अशी खूण केली. आणि तो सनाच्या मागोमाग तिच्या रूम मध्ये गेला. चहा चा कप बाजूला ठेवून सना रडत बसली होती. त्याने कप बाजूला ठेवला आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारले " काय झालेय बेटा ? विशाल सोबत भांडलीस का ? काय ते नीट सांग ? आम्ही आहोत तुझ्या सोबत." आता मात्र सणाचा बांध फुटला ती ओक्सबोक्शी रडू लागली " पप्पा विशाल ने मला फसवले . तो तिथे कुठल्यातरी दुसऱ्याच मुलीच्या प्रेमात पडलाय आणि आता मला टाळतोय. आज त्याचे सगळी नाती तोडलि. " . सनाच्या अश्रुनी त्याचा शर्ट ओला झाला. त्याने तिचा चेहरा हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात पहिले. तो आतून थरारला. आज सनाच्या डोळ्यात त्याने "तिचे" दुःख पहिले. त्याला हि आपला भूतकाळ आठवला. त्यानेही कुणा  दुसऱ्या व्यक्ती साठी कुणाला तरी असेच अर्धवट सोडले होते. ती  बिचारी जग सोडून गेली होती. हे आठवले आणि आता मात्र तो पूर्णपणे हादरला.  त्याच्या चुकीमुळे झालेल्या गोष्टीची त्याला पुनरावृत्ती करायची नव्हती. नियती कसा खेळ खेळली होती.  आपल्या आयुष्यात घडलेल्या त्या काळ्या घटनेची पुनरावृत्ती नको. आज इथे त्याच्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न होता. सनाला जवळ घेत त्याने निर्णय घेतला कि सनाला या धक्क्यातून सावरायचे, काही झाले तरी.




 

Thursday, 2 November 2017

आनंदाची बात काही औरच ...... ( महाराष्ट्र टाइम्स, मुंबई टाइम्स ३१.१० . २०१७ )

​​
​​
​​
आम्ही विद्यामंदिर ​, विरार ​चे १९९२ विद्यार्थी.  ​हल्ली प्रत्येकाचेच स्नेहसंमेलन होते. सगळेच शाळा कॉलेज चे मित्र मैत्रिणी भेटतात. आम्ही हि भेटतो अगदी ना चुकता ३ -४ महिन्यातून एकदा. वर्षातून एक दोनदा पिकनिक ला हि जातो.

पण वर्षातून एकदा तरी आम्ही असे काहीतरी काम करतो ज्याने आम्हाला आपल्या समाजांचे ऋण हि फेडता येतात आणि एक मानसिक समाधान हि लाभते.  प्रत्येक वर्षी एकदा तरी आम्ही सगळे मिळून एक डोनेशन फंड काढतो आणि एखादा वृधाश्राम, किंवा गरजू व्यक्ती, किंवा अनाथाश्रम किंवा जिथे खरंच कुणीतरी काहीतरी द्यायची गरज आहे अशा ठिकाणी मदत करतो.

ह्या वर्षी आम्ही वसई मधील एका वृध्दाश्रमाला औषध आणि काही खाण्याचे जिन्नस दिले. तिथे असलेल्या त्या वृद्ध बायकांना किती आनंद झाला आम्हाला भेटून. आम्ही दिवाळीच्या शुभेच्छा देताना त्यांना खाऊ दिला तेव्हा त्यांनी अगदी आजी सारखे जवळ घेऊन आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले. त्यांना कुणीतरी दिवाळी निम्मित भेटण्यास आले आहे याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.

त्यानंतर आम्ही लोकनारायण जयप्रकाश हॉस्पिटल इथे गेलो. जिथे कुष्ठरोग्यांसाठी हॉस्पिटल कम केअर सेन्टर मध्ये गेलो. बाहेरून पाहताना वाटले काय असेल इथे ? पण आत गेल्यावर आम्ही भारावून गेलो. ३५ एकर जागेत डॉ. सामंत आणि त्यांचे सोबती डॉ. परुळेकर यांनी नंदनवन फुलवले आहे.  हॉस्पिटल, शाळा, कॅन्सर पेशंट साठी वेगळा वॉर्ड, ऑपेरेशन थिएटर , शेती, बायोगॅस प्लांट, वसतिगृह सगळेच. इथे येणाऱ्या लोकांवर फुकट उपचार केले जातात. तिथे हि आम्ही थोडे जिन्नस व त्यांना लागणाऱ्या काही उपयोगी वस्तू दिल्या.

आम्ही जे दिले होते ते १% हि नव्हते. डॉ. सामंत, डॉ. परुळेकर आणि त्या महिलाश्रम सांभाळणाऱ्या महान लोकांसमोर आपण किती खुजे वाटतो. पण अशा काम करणाऱ्या लोकांना पाहून आम्हालाही आपल्या समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली. मनापासून असे वाटते कि आपण जसे आपल्या मजा मस्ती साठी पैसे खर्च करतो तसे प्रत्येक ग्रुप ने असे  जर छोटे मोठे काही केले तर कितीतरी लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकतो.

दरवर्षी प्रमाणे या वर्षीची दिवाळीही आमच्या  "टीम १९९२" ने सार्थकी लावली. आणि अशीच पुढेही आम्हाला जमेल तशी हि सेवा अशीच सुरु ठेव